Sunday 25 March 2012

चंद्रपूर जिल्हा भौगोलिक क्षेत्र

जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :-  १०,७९३.०९ चौ.कि.मी.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते२०.५ याउत्तर अंषावर व ७८.५ ते ८०.६ टक्केया पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे. इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळेशेतजमीन सुपीक बनली आहे.
तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत.  नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.

वन :- जिल्हयात सर्वच तालुक्यात वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत.  जिल्हयातील ३,५०,२०० हेक्‍टर क्षेत्र वनाखालील असनू त्याचा जिल्हयाच्या एकुण भूक्षेत्राची ३२.०६ इतकी टक्केवारी आहे.

हवामान व पर्जन्य  :- चंद्रपूर जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळयात दमट असते. उन्हाळयात तापमान जास्त असते. जिल्हयात पावसाचे प्रमाण जास्त असुन सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यात पाऊस जास्त पडतो.  जिल्हयाचे सर्वसाधारण  पर्जन्यमान १३०९.५० मि.मि. आहे.
 
जलसिंचन :- कोल्हापूरी बंधारे ५५१ सिंचन क्षमता १९३०० हेक्टर, जवाहर विहिरी ६५३४, इतर विहिरी १९३५,तेलपंप ४७७६, विजपंप १२८७१०.
 
ग्रामीण व नागरी लोकसंखेचेप्रमाण :- जिल्हयाच्या एकुण लोकसंख्यापैकी ७३.०७ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.९३ टक्के शहरात राहतात.

अनुसुचित जाती जमाती :- २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकुण लोकसंख्येत अनुसुचित जाती प्रमाण १४.३ टक्केअसून अनुसुचित जमातीचेप्रमाण १८.१ टक्के आहे.

कामगार :- २००१ चे जनगणेनुसार जिल्हयातील एकुण कामगारांची संख्या ९,३०,७९१ आहे. काम करणा-यापैकी २५.७ शेतकरी, ३९.३ शेतमजूर , २.२ घरगुती उद्योग व ३२.९ टक्‍के इतर सेवेत.

भूधारक  :- १९९०.९१ च्या कृषि गणनेच्या माहितीनुसार जिल्हयात  एकुण २,०१,५०० भूधारक  असून एकुण शेतजमीन ५२००८१ हेक्टर आहे.

पिकपध्दती :- जिल्हयातील २००४-२००५  मधील एकूण पिकाखाली असणा-या ५,३९,८०० हेक्टर क्षेत्रापैकी खरीप हंगामात तृणधान्य पिकाखाली क्षेत्र १२९७७९ हेक्टर, कडधान्य पिकाखाली २४४५५ गळीत धान्यपिकाखाली १४८३१५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

महत्वाचे उद्योग :- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी

No comments:

Post a Comment